पुणे : कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचं पुणे कनेक्शन समोर आले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी चार जणांना अटक केली. त्यातील एक अमोल काळे आहे.


आरोपी अमोल काळे हा पुणे जिल्ह्यातील चिंचवडमधील राहणारा आहे. मूळचे आंबेगाव तालुक्यातील घोडेगावचे असलेले काळे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी चिंचवडमध्ये स्थायिक झाले आहे. अमोल काळेचे वडील अरविंद काळे हे चिंचवडमध्ये पानटपरी चालवतात.

अमोल हा आपले आई-वडील, पत्नी, मुलगा यांच्यासोबत राहतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून गायब होता.

अमोल हा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचं पोलीस चौकशीत समोर आले आहे.

5 सप्टेंबर 2017 रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरुतील त्यांच्या राहत्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती.