टेमघर धरणाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आल्यानंतर त्यातील श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शनविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने होत होती. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते.
15 वर्षापूर्वी टेमघर धरणाचं बांधकाम करण्यात आलं. मात्र काही वर्षांपासून धरणाच्या भिंतीतून धबधब्याप्रमाणे पाणी वाहू लागलं. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
यावर आज श्रीनिवास कन्सट्रक्शनचे सात कर्मचारी, प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शनचे दोन अधिकारी आणि बाकी उरलेले जलसंपदाचे अधिकारी अशा एकूण 33 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अविनाश भोसलेंना वाचवण्यासाठी टेमघर प्रकरणातून सोमा कन्स्ट्रक्शनला वगळलं असल्याचा आरोप आपने केला आहे.