पिंपरी-चिंचवड: पिंपरीतल्या कासारवाडीमध्ये गिझरचा शॉक लागून एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूर्या तलवार असं या लहानग्याचं नाव आहे.

 

अवघ्या एक वर्षांच्या सूर्याला गिझरला शॉक लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सूर्याच्या मृत्यूनं केवळ तलवार कुटुंबीयच नव्हे तर अवघ्या परिसरावर शोककळा पसरली आहे.

 

आज सकाळी सातच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चिमुकल्याचा या दुर्दैवी मृत्युमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.