पुणे: पुण्यामध्ये पाहुण्यांकडून पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियानं ताम्हिणी घाटातल्या जंगलात मनसोक्त ट्रेकिंग केलं. गेल्या 18 महिन्यांपासून अव्याहतपणे क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय संघाने यानिमित्तानं सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आपला शिणवटा घालवला.

याच ट्रेकिंगचा खास फोटो टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंही शेअर केला. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना पुण्यात होत्या. या सामन्यानंतर टीम इंडियानं जवळच असलेल्या ताम्हिणी घाट ट्रेक करायचं ठरवलं.


एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्यासोबत अख्खी टीम इंडिया 26 फेब्रुवारीला गरुड माचीमध्ये पोहोचली. त्यानंतर रात्रीच्या चांदण्यामध्ये भोजन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ताम्हिणी घाटातल्या कॅमल बॅकपर्यंतच्या ट्रेकिंगला सुरुवात झाली. याच ट्रेकिंगचे फोटो आणि व्हिडिओ बीसीसीआयनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले आहेत.



इतकंच नाही, तर टेकडीच्या माथ्यावर टीम इंडियाने तिरंगा फडकवून त्याला सॅल्यूट केला. सलग 24 तासांच्या धम्माल, मजामस्तीने टीम इंडियाचा शिणवटा कुठच्या कुठे निघून गेला आणि विराट ब्रिगेड बंगलोरच्या दिशेने रवाना झाली.

 

संबंधित बातम्या:

तब्बल 13 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा भारतात विजय!

सलग 19 कसोटी सामने अपराजित राहिलेल्या विराटला पराभवाची चव