पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक अधिकारी यशवंत माने यांची तडकाफडकी बदली झाली आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याच्या आरोपावरुन मानेंना जाब विचारला गेल्यामुळे या बदली वर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत.


पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडील एकहाती सत्ता भाजपनं काबीज केली. त्यानंतर ईव्हीएम घोटाळा करुनच भाजपने सत्ता मिळवल्याचा आरोप करत, माने यांना पराभूत उमेदवारांनी जाब विचारायला सुरुवात केली होती. अशातच त्यांची बदली झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

शिर्डी कनेक्शन लावत माने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या कार्यलयात दाखल झाले आहेत. माने आता विखे पाटील यांचे कार्यालयीन अधिकारी म्हणून रुजू होतील. त्यामुळे या बदली मागची नेमकी कारणं कोणती, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र माने यांनी ही बदली निवडणुकीपूर्वीच झाल्याचा दावा केला आहे.

पिंपरी चिंचवडमहापालिका निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत पुण्यात पराभूत उमेदवारांनी आंदोलन केलं. झाशीची राणी चौकात भाजप वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढली.

संबंधित बातम्या :


पुण्यात सर्वपक्षीयांकडून ईव्हीएमची अंत्ययात्रा