पुणे: विमानतळ म्हटलं की, कोणत्याही गोष्टीला अव्वाच्या सव्वा दर लावण्यात येतात, यामुळे अनेकजण अशा ठिकाणी खाणं पिणं टाळतात, मात्र आता पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरती याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे विमानतळ नव्या टर्मिनलवर चहा आणि पाणी स्वस्तात मिळणार आहे. लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे 100 रुपयांना तर पाण्याची बाटली 60 ते 80 रुपयांना विकत घ्यावी लागते. अशातच पुणे विमानतळ नव्या टर्मिनलवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. (Pune Airport)
विमान टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर हे सामान्य नागरिकांना परवडणारे नसतात. त्यामुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ती आता पूर्ण होत आहे. त्यानुसार आता चहा, पाणी 20 रुपयांत विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर एक छोटा स्टॉल सुरू करणार आहे. त्यामुळे आता सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी 'उडान' योजना सुरू केली आहे. या स्टॉलवर कमी दरात चहा आणि पाणी उपलब्ध करून देण्याची ही सुविधा देण्यात येणार आहे .
पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर चहा 100 रुपयांना तर पाण्याची बाटली 60 ते 80 रुपयांना प्रवाशांना विकत घ्यावी लागते. विमान टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे नाहीत. यामुळे सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी 'उडान' योजना सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत काही प्रवाशांना कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध होणार आहे. उडाणच्या अंतर्गत आता चहा, पाणी 20 रुपयांत विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर एक छोटा स्टॉल सुरू करणार आहे. या स्टॉलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.