पुणे : जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडत असून, याच सभेतून टी.पी. मुंडेंच्या (T P Munde) घोषणेने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर टीका करतांना, 'कोण आला रे कोण आला जरांगेचा बाप आला' अशी घोषणा मुंडे यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर, यावर आता जरांगे यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


दरम्यान, यावेळी बोलतांना टी.पी. मुंडे म्हणाले की, "मराठा समाजाने आपले शोषण केलं. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तरी आहे का? जरांगेच्या शेजारी आणि आरक्षण मागतो आहे. 2024 साली ओबीसीचे मुख्यमंत्री छगन भुजबळ झाले पाहिजे. तसेच, उपमुख्यमंत्री प्रकाश शेंडगे यांना करा आणि यांना वठणीवर आणायचे असेल तर गृहमंत्री टी.पी. मुंडे यांना करा. आमच्या हाताला ऊस तोडून फोड आले. आता पाटील तुम्ही बाजूला सरा आणि कोयता तोडण्याऱ्याना चाव्या द्या. दोस्ती भुजबळ साहब  के साथ होती है, जरांगे सारख्या गद्दारी करणे वालो से नही होती. कोण आला रे कोण आला जारांगेचा बाप आला. तो म्हणतो पांढऱ्या दाडीचा, त्याचा बापाची केस पांढरे आहेत. बापाची केस पांढरे असणार की, जरांगे जरा जपून बोला. जालना येथे हल्ला झाला, पण निलंबित फक्त ओबीसी समाजाचे अधिकारी झाले.  शिंदे सरकारला सांगतो आहे, त्यांना ताबडतोब कामावर घ्या," असेही मुंडे म्हणाले. 


अन्यथा आम्ही हातात दंडुके घेऊ: टी पी मुंडे 


जरांगे यांच्यावर इंदापूरच्या सभेत टीका करणाऱ्या टी पी मुंडे यांनी हिंगोलीच्या सभेत देखील अशीच टीका केली होती. यावेळी बोलतांना ते म्हणाले होते की, "आमचे घर पेटवून देण्यासाठी कोणी येत असेल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही. जाणीवपूर्वक आम्हाला खवळू नका. ऊस तोड कामगारांच्या हातात ऊस तोडताना काय असते हे जाणून घ्यावे, आपल्याला कोणी धक्का द्यायला आला तर त्याला उंच पाडा, तुम्ही दंडलशाही करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही हातात दंडुके घेऊ, चिलत्या जरांग्या कुवत काय तुझी, तमाशे नाचवत फिरले आणि जमिनी विकल्या. पोलीस बहिणीला तुम्ही दगडाने मारतात, असे टी पी मुंडे म्हणाले होते. 


राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसी मेळाव्याचं आयोजन 


मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या याच मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नयेत, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, यासाठीच राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. जालना, हिंगोली जिल्ह्यानंतर आता पुण्यातील इंदापूर येथे आज ओबीसी मेळावा पार पडला. अपेक्षेप्रमाणे या ओबीसी मेळाव्यातील नेत्यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. सोबतच मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यासाठी विरोधी केला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


'सौ सुनार की एक लोहार...'; भुजबळांच्या सभेची सुरवातच जरांगेंवरील टीकेने; म्हणाले...