पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) पहिली ओबीसी एल्गार सभा ही पुणे (Pune) जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये होत आहे. आज दुपारी 1 वाजता ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास दीड लाख ओबीसी बांधव येतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. इंदापूर शहरालगत असलेल्या शंभर फुटी मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे ज्या मैदानात मनोज जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) सभा झाली होती, त्याच मैदानात ओबीसी मेळावा होत आहे. या ओबीसी एल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, बबनराव तायवाडे, लक्ष्मण गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

Continues below advertisement

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यभरात ओबीसी एल्गार मेळाव्याचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी जालना आणि हिंगोली जिल्ह्यात ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तर, राज्यातील तिसरा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिला ओबीसी एल्गार मेळावा आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे, ज्या शंभर फुटी मैदानात हा ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे, त्याच शंभर फुटी मैदानात यापूर्वी मनोज जरांगे यांची देखील भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे, आजच्या या मेळाव्यात भुजबळ नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जरांगेंना प्रत्युत्तर देणार? 

मागणी काही दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळत आहे. आपल्या प्रत्येक सभेत जरांगे हे भुजबळ यांच्यावर निशाणा साधतांना पाहायला मिळत आहे. तर, जरंगे यांच्या टीकेला भुजबळ देखील आपल्या भाषेत उत्तर देत आहे. त्यामुळे आजच्या सभेतून पुन्हा एकदा भुजबळ हे जरांगे यांच्यावर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. तर, इतर ओबीसी नेत्यांकडून देखील जरांगे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या ओबीसी मेळाव्यातील प्रमुख नेत्यांचे भाषण महत्वाचे ठरणार आहे. 

Continues below advertisement

लक्ष्मण हाके देखील मेळाव्यात उपस्थित राहणार...

विशेष म्हणजे इंदापूर येथील भुजबळ यांच्या ओबीसी मेळाव्यात राज्य मागास आयोगाचा राजीनामा दिलेले सदस्य लक्ष्मण हाके उपस्थित राहणार आहे. राज्य शासनाच्या भूमिकेविरोधात हाके यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. हाके हे सध्या ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आहेत प्रवक्ते आहेत. त्यामुळे आजच्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : शिकला होता तर तुरुगांत कशाला गेला, माझं शिक्षण नाही तरी मी आरक्षण निर्णयावर आणलं, जरांगे पाटलांची भुजबळांवर जहरी टीका