Ajit Pawar Clean Chit : राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरूवारी पार पडला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरणाने (Prevention of Benami Property Transactions Appellate Tribunal) मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली. 2021च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्ता काल(शुक्रवारी) मंजूर करण्यात आल्या आहेत. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार अपीलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय देत अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेनामी मालमत्तेच्या मालकीचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. (ajit pawar clean chit)
पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांना अजित पवारांना मिळालेल्या क्लिनचीट बाबतच्या विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी चार शब्दातच प्रतिक्रिया दिली आहे. 'याची मला महिती नाही', असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे. तर विरोधकांनी अजित पवारांच्या शपथविधीनंतर आणि भाजपसोबत गेल्यामुळं हा दिलासा देत त्यांची जप्त केलेली मालमत्ता परत देण्याचा निर्णय घेण्यात आलं असल्याचं नेत्यांनी म्हटलं आहे. (ajit pawar clean chit)
नेमके प्रकरण काय?
7 ऑक्टोबर 2021 मधील हे प्रकरण आहे. प्राप्तिकर विभागाकडून अनेक कंपन्यांवर छापे टाकण्यात आले होते, ज्यामध्ये अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी मालकीच्या काही मालमत्तेचा कथित संबंध असलेली काही कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. मात्र, आता आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगून न्यायाधिकरणाने हे दावे फेटाळून लावले. त्याचबरोबर अजित पवारांना क्लिनचीट (ajit pawar clean chit) दिली आहे.
मालमत्ता जप्तीचं नेमकं प्रकरण काय?
अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता बेनामी संपत्ती कायद्याखाली जप्त करण्यात आली होती. यावरील जप्ती उठवण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाच्या निकालानुसार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्तांवरील जप्तीही उठवण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्तांचा समावेश होता.