Supriya Sule : आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाचा मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप भुजबळांनी केला. त्यावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर देताना त्यांच्याकडे याचा काही पुरावा आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. 


सुळे म्हणाल्या की, "शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा काही पुरावा आहे का त्यांच्याकडे साडीआर काढून बघू कोणी कोणाला फोन केला ते. ते काढणं काही फार अवघड नाही, मी गेली १० वर्षे आरक्षणावर बोलते आहे. हे सर्वजण आत्ता बोलत आहेत. आरक्षणाबद्दल संसदेत बोललं पाहीजे, तुम्ही सर्व माहिती काढून पाहा मी संसदेत धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लीम आणि भटक्या-विमुक्त जातींच्या आरक्षणावर सातत्याने प्रस्ताव आणा, आम्हाला प्रस्ताव पाठवा, आम्ही ताकदीने तुमच्यासोबत उभं राहु असं म्हटलं आहे. पण, प्रस्ताव तर हातात आला पाहिजे, गेल्या १० वर्षांमध्ये मोदी सरकारने आनेक आरक्षणाची बिलं ऐकली. त्या प्रत्येक बिलावर मी बोलले आहे असंही पुढे सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. 


महाराष्ट्रासह बिहारमध्ये, राजस्थानमध्ये आरक्षणाचा विषय आहे, एक बिल आणा त्यावर ३,४ दिवस चर्चा करू. एक काय तो निर्णय घेऊ. पण सरकारने त्यावर प्रस्ताव तर दिला पाहिजे. कोणत्याही सर्वपक्षीय बैठकीचा प्रस्ताव आम्हाला पाठवण्यात आलेला नव्हता. प्रस्ताव आल्याशिवाय अजेंडा कसा समजणार असंही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुढे म्हटलं आहे. तर चर्चेसाठी त्यांनी आमंत्रत्ण कोणाला दिलं ते मला माहिती नाही. जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असेल तर, तर मुख्यमंत्र्यांनी कोणालाही एक फोन करावा आणि बैठक करावी. त्यांनी बोलवावं आणि त्यांनी अजेंडा सांगावा आम्ही त्यासाठी उपस्थित राहु असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 


काय म्हणाले होते भुजबळ?



शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप करत भुजबळ म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी शरद पवारांना घेऊन यावं अशी विनंती जितेंद्र आव्हाडांना केली होती. व्ही पी सिंहांनी जे ओबीसी आरक्षण दिलं त्याची अंमलबजावणी शरद पवारांनी केलं याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आता आरक्षणाच्या बाबतीत जे काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून पवारांनी त्या बैठकीला येणं अपेक्षित होते. पण बारामतीतून कुणाचातरी फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला.