Pune News : पुणेकरांना प्रतिक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं(Pune International Airport) नवं टर्मिनल आजपासून कार्यान्वित झालं आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरु झालं आहे. नव्या टर्मिनलमधून वर्षाला ९० लाख प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. सुसज्ज व्यवस्थांसह या विमानतळाला ६ बोर्डिंग गेट निर्माण करण्यात आले आहेत. एकाचवेळी पंधराशे ते अठराशे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोई-सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळत आहे.
पुणेकर प्रतिक्षेत असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं(Pune International Airport)नवं टर्मिनल आता कार्यान्वित झालं आहे.आज रविवारी (१४ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरू झालं आहे.पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी खासदारपदी विजयी झाल्यानंतरच पाठपुराव्याला सुरुवात केलेली होती. यासाठी सर्वात मोठा असलेला सीआयएसएफच्या जवानांच्या संख्येचा प्रश्न मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सोडवला होता. तसेच इतर तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करुन घेतल्या आणि नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा केला होता.
महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण इमारतीत आहे.
नव्या टर्मिनलवरून एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमानाचे पहिलं उड्डाण झाले आहे. केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पहिल्या प्रवाशाला दुपारी 1 वाजता बोर्डिंग पास देण्यात आली आहे.
प्रवाशांना खरेदी करसाठी विविध दुकाने, खाद्यपदार्थ आदी सोई या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. लहान मुलांच्या देखभालीसाठी शिशू देखभाल कक्ष उभारण्यात आला असून त्यात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. टर्मिनलवर प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी दोन ई-बस आणि आठ ई-कार्टची सुविधा उपलब्ध असणार आहे. प्रवाशांना टर्मिनलच्या गेटपर्यंत ओला, उबेरच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
कसे आहे नवीन टर्मिनल?
एकूण क्षेत्रफळ : 52 हजार चौरस मीटर
तासाला प्रवासी क्षमता : 3 हजार
वार्षिक प्रवासी क्षमता : 90 लाख
वाहनतळ क्षमता : 1 हजार मोटारी
प्रवासी लिफ्ट : 15
सरकते जिने : 8
चेक-इन काऊंटर : 34
एकूण खर्च – 475 कोटी रुपये
व्यस्त वेळेत 3 हजार प्रवासी क्षमता
भारतीय विमानतळांना आधुनिक सुविधा देण्यात येणार आहे. विमानतळावर स्थानिक संस्कृतीला प्रदर्शित करण्यात आलं आहे. पुणे विमानतळाच्या(Pune International Airport)एकात्मिक टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 52 हजार चौ.मीटर असून सर्वाधिक व्यस्त वेळेत 3 हजार प्रवासी क्षमता आहे.