कामशेत रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेखाली झोपून तरुणाची स्टंटबाजी
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2016 12:29 PM (IST)
पुणे : पुण्यातील कामशेत रेल्वे स्टेशनवरील एका जीवघेण्या स्टंटचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कामशेत रेल्वे स्टेशनवर हे जीवघेणे स्टंट करणारे तरुण कोण आहेत, कोठे राहतात याची माहिती अद्याप समोर आली नाही. एक तरुण जीवावर उदार होऊन रेल्वे रुळावर झोपला आहे, तर त्याचे इतर मित्र त्याला प्रोत्साहन करताना व्हिडीओतून दिसत आहेत. रेल्वे निघून गेल्यानंतर दृश्यांमध्ये हे सर्व तरुण स्पष्ट दिसत आहेत. असे जीवघेणे प्रकार रोखायचे असल्यास पोलिसांनी या तरुणांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची गरज आहे. पाहा व्हिडीओ-