पुणे : पुण्यात पोलिस आयुक्त बदलण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकारी सुद्धा बदलण्यात आले आहेत. पुणे जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिस आयुक्तांची सुद्धा बदली करण्यात आली आहे. रितेश कुमार यांच्या जागी नागपूरहून अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुण्यातील विभागीय आयुक्तांची सुद्धा बदली करण्यात आली आहे.


पुणे पोलिस दलातही खांदेपालट 


दुसरीकडे, पुणे शहरातील 700 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या 14 फेब्रुवारीला होणार आहे. पाच वर्षांपासून अधिक काळ एकाच पोलिस ठाण्यात आणि विभागात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समावेश असलेल्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. एकाच पोलिस ठाण्यात तसेच गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा आणि पोलिस मुख्यालयात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागवली आहे. येत्या 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी पोलिस कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या या संबंधित पोलिस कर्मचार्‍यांना समोर बोलावून त्यांनी मागितलेल्या तीन पर्यायानुसार करण्यात येणार आहे. 


दरम्यान, पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आल्यानंतर रितेश कुमार यांची पदोन्नतीने राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. गेल्या दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या पुणे पोलिस पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तपदी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली. 


राज्यातील 59 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने दिले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी राज्य राखीव दलाचे समादेशकशैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे पोलिसांच्या उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली


राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या


दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या मागील आठवड्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या