पुणे : एखादी गोष्ट आपल्याला बोचत असेल तर ती वेदना असह्य होते. मात्र 15 वर्षांच्या सुरज सवंत याने तर तब्बल सहा वर्ष नाकात अडकलेल्या काडीसोबत काढले. आता पुण्यातील ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन त्याच्या नाकातली ही काडी काढण्यात आली आहे.
सुरज हा मूळचा नेपाळमधील काठमांडू इथे राहणारा आहे. सूरज सहा वर्षांपूर्वी झाडावरून खाली पडला होता. त्यावेळी एक काडी त्याच्या डोळ्याला लागली. ती काडी डोळ्यातून थेट त्याच्या नाकात गेली.
हा अपघात घडल्यानंतर सूरजच्या आई-वडिलांनी लगेचच डॉक्टरकडे धाव घेतली. पण स्थानिक डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. अखेर सूरजच्या नातेवाईकांनी त्याला पुण्याच्या ससून रूग्णालयात दाखल केलं.
यादरम्यान सुरजला वेदनाही सहन कराव्या लागल्या. ससूनच्या डॉक्टरांनी सुरजचं सिटी स्कॅन केलं. तेव्हा आठ सेंमीचा काडीचा तुकडा त्याच्या नाक आणि मणक्याच्या मध्ये अडकल्याचं लक्षात आलं.
ही शस्त्रक्रीयाही अत्यंत आव्हानात्मक होती. यामध्ये सुरज कायमस्वरुपी अपंग होण्याचीही शक्यता होती. मात्र ससूनच्या डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रीया यशस्वी करुन दाखवली.
मुलाच्या नाकात अडकलेली काडी तब्बल सहा वर्षांनी काढली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2018 07:38 PM (IST)
15 वर्षांच्या सुरज सवंत याने तर तब्बल सहा वर्ष नाकात अडकलेल्या काडीसोबत काढले. आता पुण्यातील ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन त्याच्या नाकातली ही काडी काढण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -