SSC 10th Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता  दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर  (SSC Result 2024) करण्यात आला आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे. 


कोकण विभाग या निकालात अव्वल ठरला आहे. कोकण विभागात ९९.०१ टक्के निकाल लागला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर आणि तिसऱ्या स्थानावर पुणे विभागाने बाजी मारली आहे. कोल्हापूराचा ९७.४५ आणि पुण्याचा ९६.४४ टक्के निकाल लागला आहे. चौथ्या स्थानावर मुंबईचा विभाग आहे. मुंबई विभागाचा ९५.८३ टक्के निकाल लागला आहे. दहावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी १ वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार आहे. 


नऊ विभागीय मंडळ निकाल-


पुणे....९६.४४%
नागपूर ...९४.७३%
छत्रपती संभाजीनगर ...९५.१९.%
मुंबई .....९५.८३%
कोल्हापूर ....९७.४५.%
अमरावती ....९५.५८%
नाशिक .....९५.२८%
लातूर .....९५.२७%
कोकण .....९९.०१%


निकालाची ठळक वैशिष्ट्ये-


या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,७७० पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.१६ आहे.


राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,८९४ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ ने जास्त आहे. एकूण १८ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५,३१,८२२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,१४,८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ७९,७३२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.


दहावीचा निकाल कुठे पाहाल? 



महत्त्वाच्या इतर बातमी:


दहावीच्या निकालासंदर्भातील सर्व अपडेट्स फक्त एका क्लिकवर...