पुणे : स्पाईसजेटचं विमान रखडल्याने 40 उद्योजकांसह अनेक प्रवासी सकाळी 7.20 वाजल्यापासून पुणे विमानतळावर रखडले आहेत. विमानाची काच फुटली असल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.


सकाळी 7.20 ला विमान निघणार होतं, पण 8 वाजता बोर्डिंग सुरु केलं. 20 मिनिटांनी प्रवाशांना पुन्हा खाली उतरवलं आणि 10.30 ला विमान निघेल असं सांगितलं. पुन्हा 12.30 ला आणि आता 3.30 ला विमान निघेल, असं सांगण्यात आलं आहे.

विमानाच्या पुढच्या काचेला तडा गेला आहे, ती बदलल्यावरच विमान सोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात येत आहे. पण आधी काच तडकलेली असताना तसंच घेऊन जाणार होता का?, असा सवाल संतप्त प्रवाशांनी केलाय.