नागपूर: पुण्याजवळच्या भोसरीतील एमआयडीसी जमीनीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आज झोटिंग समितीसमोर हजर झाले. यावेळी खडसेंनी या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल माहितच नसल्याचा जबाब नोंदवल्याचा दावा एमआयडीसीच्या वकिलांनी केला.

त्यामुळं खडसेंनी भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यात आपला जबाब बदलल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.

आधी त्यांनी ही जमीन एमआयडीसीची नाही असं वक्तव्य केलं. पण त्यानंतर त्यांनी थेट घूमजाव करत आपल्याला माहितच नाही, असा जबाब नोंदवला असा दावा एमआयडीसीच्या वकिलांनी केला आहे.

भोसरी जमीन खरेदीप्रकरण काय आहे?

भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं.

महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसरीत केलेल्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीसाठी एका वर्षापूर्वी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
भोसरी जमीन खरेदी प्रकरण, खडसेंची झोटिंग समितीसमोर हजेरी

 तथ्यहीन आरोपांना उत्तर देणार नाही : खडसे

खडसेंना पक्षाची भूमिका कळवा, शाहांच्या आदेशानंतर गडकरींचा खडसेंना फोन

‘तो’ अहवाल खडसेंच्या बाजूनंही असू शकतो: रावसाहेब दानवे

खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील

सबळ पुराव्यांशिवाय खडसेंवर बोलणार नाही, अण्णांची भूमिका

खडसेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा : पृथ्वीराज चव्हाण

विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला

एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना

एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?

खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला

मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता

ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण

..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे

खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात

गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील

‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’

खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण

खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र