पुणे: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते 1 मे रोजी होणार असल्याची माहिती आहे. काल (सोमवारी, ता, 29) दिवसभर या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर रात्रीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावर काल (सोमवारी, ता, 29) तब्बल तीन तास वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं. या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 2.2 किलोमीटरचा विठ्ठलवाडी ते फन टाईमपर्यंत हा एकेरी पूल बांधण्यात आला आहे. मात्र, पुलाचं काम पूर्ण होऊन दीड महिना झाला तरीही नागरिकांसाठी खुला करण्यात आला नाही. उद्घाटनासाठी नेते मंडळींना वेळ नसल्याने उद्घाटन रखडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता.
पुलाचं काम पूर्ण होऊन दीड महिना झाला..
त्यानंतर काल (सोमवारी, ता, 29) दिवसभर या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर रात्रीच अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या पुलामुळे राजाराम पूल ते वडगावकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 2021 मध्ये या पूलाचं भूमीपूजन झाल होतं. त्याचवेळी कामही सुरु झालं. 61 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 106 गर्डर उभारले आहेत. मात्र, पुलाचं काम पूर्ण होऊन दीड महिना झाला तरीही नागरिकांसाठी खुला करण्यात आला नाही.
फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने..
उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने अखेर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे गुरुवारी (1 मे) उद्घाटन होणार आहे. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते पण टाइम थियेटरपर्यंतच्या 2.2 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झालेले आहे, मात्र हा पूल नागरिकांसाठी खुला केला जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या पुलाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं, पण त्यांची तारीख मिळाली नव्हती. फडणवीस पुण्यात दोन दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित होते, परंतु या काळातही हा उड्डाणपूल खुला होऊ शकला नव्हता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले जाईल, असा निरोप महापालिका प्रशासनाला राज्य सरकारतर्फे देण्यात आलेला आहे. त्यानुसार हा कार्यक्रम 1 मे रोजी पार पडणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.