पुणे : आपल्या रुचकर आणि दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांच्या मनावर गेली 75 वर्षे अधिराज्य गाजविणारे चितळे बंधू आपली जगप्रसिद्ध बाकरवडी आता नव्या ‘मिनी’ स्वरूपात घेऊन आले आहेत. चितळेंच्या या खमंग बाकरवडीचे हे नवे 'मिनी' रूप खवय्यांच्या विशेष पसंतीस देखील उतरत आहे. त्यामुळे बाकरवाडी घेण्यासाठी आणि खाण्यासाठी खवैय्ये त्यांच्या दुकानावर गर्दी करत आहेत.
सध्या देशभरात आयपीएलचा उत्साह शिगेला पोहोचत असताना या क्रिकेट फिव्हरचे औचित्य साधत चितळे बंधूंनी ही ‘मिनी’ बाकरवडी सादर केली आहे. गेट मॅच रेडी विथ चितळे बाकरवडी म्हणजेच आयपीएल क्रिकेट सामन्याची तयारी चितळे बाकरवडी सोबतच असा संदेश देत सगळ्यांच्या आवडीची ही बाकरवडी नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिनी बाकरवाडीच्या साथीने क्रिकेटप्रेमींचा आयपीएल सामन्यांचा थरार अधिक रोमांचक होईल असा विश्वास व्यक्त करीत चितळे बंधूं मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे म्हणाले, "आयपीएल दरम्यान क्रिकेट चाहते वेगवेगळ्या संघांमध्ये जरी विभागले गेले तरी खाद्यपदार्थ खऱ्या अर्थाने त्यांना एकत्र बांधून ठेवतात. आता चितळे बंधूंच्या या नव्या मिनी बाकरवडीसोबत आम्ही क्रिकेटरसिकांच्या रोजच्या क्रिकेट दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनणार आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”
आयपीएल ही भारतातील एक नावाजलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळेच आम्ही या क्रिकेट हंगामाच्या निमित्ताने मिनी बाकरवडी बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या भविष्यात या नव्या उत्पादनामुळे आम्ही भारताच्या नव्या बाजारपेठांमध्ये निश्चितच विस्तार करू, याची आम्हाला खात्री आहे असे चितळे बंधूं मिठाईवालेचे भागीदार केदार चितळे यांनी सांगितले. चितळे बंधू सध्या 75 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत ते ‘स्नॅकिंग पार्टनर’ म्हणूनही जोडले गेले आहेत. अशातच ही मिनी बाकरवडी क्रिकेट रसिकांना चितळेंसोबत जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे.
हेही वाचा
उद्धव ठाकरेंना दे धक्का, एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केलेल्या माजी महापौर दत्ता दळवींनी साथ सोडली