Shyam Deshpande BJP :  पुण्यात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी शहराध्यक्ष श्याम देशपांडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हे यावेळी उपस्थित होते.  श्याम देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. पुणे महापालिकेत शिवसेनेनेकडून दोन वेळा नगरसेवक होते.  त्यांच्या पत्नी संगीता देशपांडे दोन वेळा नगरसेविका होत्या.  2008- 09 देशपांडे यांनी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषविले होते.  2012 ते 2014 या कालावधीत ते पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख होते गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली होती.  त्या नंतर त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्यासोबत त्यांच्या  विनोद गायकवाड, नारायण पाटील, समीर भट, अनिल हिंगमिरे, लक्ष्मण क्षीरसागर, नामा देडे, महेंद्र आढाव, गोविंद चव्हाण, विजय कोलसे, तुषार गाढवे,अनिल मरळ सुरेश कुलकर्णी या कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 


ठाकरे गटाला मोठा धक्का

मागील काही महिन्यांपासून शिवसेनेला चांगलीच गळती लागली आहे. एकामागून एक नेते भाजपमध्ये किंवा शिंदे गटात सामील झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा चांगलाच धक्का बसल्याचं दिसून येतंय. त्यात आता माजी नगरसेवक  श्याम देशपांडे यांनी जाहीर भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे.


2022 मध्ये शिवसेनेतून हकालपट्टी केली होती.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 2022 मध्ये श्याम देशपांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. श्याम देशपांडे 2000 ते 2012 असे 12 वर्ष कोथरुड परिसरातून नगरसेवक होते. त्यानंतर 2008 मध्ये ते पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षदेखील होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खंदशिलेदाराने भाजपत प्रवेश घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. नुकतीच कसबा पोटनिवडणूक पार पडली. त्यात भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यात आता श्याम देशपांडे यांच्याकडे भाजपकडून पुणे शहरासाठी नेमकी कोणती जबाबदारी दिल्या जाते, याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र त्यांचा भाजपमधील प्रवेश ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.