पुणे : शाहू-फुले-आंबेडकर हे आदर्श आहेत. शाहू राजे होते, ते घालत असलेली पगडी आपण घालू शकत नाही. आंबेडकर डोक्यावर काहीच घालायचे नाहीत. त्यामुळे फुलेंची पगडी घालावी, असे मत मांडले, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात म्हणाले. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक पाहण्यासाठी पवार आले होते. नाटकाच्या प्रयोगानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

पवार नेमकं काय म्हणाले?

“शाहू-फुले-आंबेडकर हे आदर्श आहेत शाहू राजे होते. ते घालत असलेली पगडी आपण घालू शकत नाही. आंबेडकर डोक्यावर काहीच घालायचे नाही. त्यामुळे फुलेंची पगडी घालावी.”, असे शरद पवार म्हणाले.

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा आज 702 वा प्रयोग पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात पार पडला. हा प्रयोग पाहण्यासाठी शरद पवार, त्यांच्या पत्नी आणि मुलगी सुप्रिया सुळे उपस्थित होते.


यावेळी शरद पवारांचा फुले पगडी आणि प्रतिकात्मक बैल जोडी देऊन सत्कार करण्यात आला. फुले-शाहू-आंबेडकर हे आदर्श असल्याचा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला. तसेच, फुले पगडी आणि पुणेरी पगडी वरची भूमिकाही परत स्पष्ट केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे फक्त भोसलेंचं राज्य नसून रायतेचं राज्य असल्याचंही पवारांनी सांगितलं.

दरम्यान, लहान सहान गोष्टींवरुन लोकांमध्ये वैर निर्माण करण्याचं सध्या वातावरण आहे. त्यामध्ये हे नाटक सामाजिक दुवा म्हणून काम करतंय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नाटक पोहोचायला हवं, असे मत शरद पवारांनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाबाबत व्यक्त केले.

संबंधित बातमी : पेशवेकालीन पगडी राष्ट्रवादीतून हद्दपार, यापुढे फुले पगडीनेच स्वागत