पुणे : मराठवाड्यातल्या दुष्काळाला ऊस आणि कारखाने जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढायला मी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह नाही, अशी खोचक टिपणी शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.


 
अवर्षणग्रस्त मराठवाड्यात 52 साखर कारखाने आहेत. त्यातले 27 सहकारी तर 25 खासगी कारखाने आहेत. मात्र तिथं ठिबक सिंचनाचं प्रमाण केवळ 3.65 टक्के इतकं आहे. मराठवाड्यात एक किलो साखर बनवायला 1900 लिटर पाणी लागतं. त्यामुळे ऊस हे सर्वात जास्त पाणी पिणारं पीक दुष्काळाला जबाबदार असल्याची टीका होत आहे.

 
याबाबत माजी कृषीमंत्री शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी राजेंद्र सिंह यांच्यासह ऊस पिकाला विरोध करणाऱ्यांवर बोचरी टीका केली.