शरद पवारांकडून खास शैलीत अजित पवारांचं कौतुक!
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2017 08:06 AM (IST)
‘अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या विकासाची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते’ अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांची कौतुक केलं.
पिंपरी-चिंचवड : ‘अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या विकासाची दबक्या आवाजात चर्चा सुरू असते’, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांवर कौतुक वर्षाव केला. अजित पवारांचं कौतुक करताना शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवरही टीका केली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व सृजन पब्लिकेशन यांच्या वतीने आयोजित ‘पिंपरी- चिंचवड अचिव्हर्स’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व गौरव कार्यक्रमात पवार काल (रविवार) बोलत होते. यावेळी शून्यातून आपलं विश्व निर्माण करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांचा पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अनेक पत्रकारांचाही यावेळी गौरव करण्यात आला.