हिमाली कांबळे यांना 7 हजार 899 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांना 3 हजार 316 मतं मिळाली. हिमाली कांबळे यांनी 4 हजार 583 मतांनी विजय मिळवला.
दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. या प्रभाग क्रमांक 21 अ च्या पोटनिवडणुकीसाठी काल (बुधवार) मतदान झालं. या निवडणुकीत केवळ 20.78% मतदान झाल्याने हिमाली कांबळे, की राष्ट्रवादीचे धनंजय गायकवाड विजयी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच हिमाली कांबळे आघाडीवर होत्या. काही तासातच त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. येत्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असून वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सांगताना हिमाली कांबळे यांना गहिवरुन आलं.
पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल:
- भाजप-आरपीआय – 94
- राष्ट्रवादी काँग्रेस – 40
- शिवसेना – 10
- काँग्रेस – 11
- मनसे – 2
- इतर – 1
- एकूण - 160