पुणे : पवार काका-पुतणे म्हणजे शरद पवार (sharad pawar)आणि अजित पवार (Ajit Pawar) आज एकाच मंचावर येणार असले तरी शेजारी शेजारी बसणार नाहीत. आज दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला (Baramati news) शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ज्या स्टेजवर आज हे नेते एकत्र येणार आहेत तिथल्या आसनव्यवस्थेचा क्रम बरचं काही सांगून जात आहे. खुर्च्यांवर कोण कुठे बसणार त्यानुसार नावांच्या पट्ट्या चिकटवण्यात आल्या आहेत. 


निमंत्रण पत्रिकेवर नाव नसताना ऐनवेळी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांच्या नावाची खुर्ची काका पुतण्याचा मध्ये ठेवण्यात आली आहे. पवार काका पुतणे या कार्यक्रमात शेजारी शेजारी बसतील असे वाटत होते. स्टेजवर बसून ते एकमेकांना बोलतात का? याची उत्सुकता होती. मात्र, दोघांच्या मध्ये प्रतिभा पवार यांची खुर्ची ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. प्रतिभा पवार यांच्या उजवीकडे शरद पवार बसतील तर डावीकडे अजित पवार बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आज पवार काका पुतणे एका मंचावर येणार असले तरी शेजारी शेजारी बसणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. 


विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. नुकताच विद्या प्रतिष्ठानचा 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित असणार आहे.  सोबत या संस्थेचं विश्वस्त मंडळही उपस्थित असणार आहे. 


टीका, टिपण्णी होणार का?


काही दिवसांपूर्वी  शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोचरा वार केला होता. त्यापूर्वीही अनेकदा दोघांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता हे दोघेही एकाच मंचावर भाषण करणार आहेत. यावेळी काय बोलणार?, एकमेकांवर टीका टिपण्णी करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


अजितदादांच्या अडचणीत वाढ; शिखर बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असल्याची कोर्टात याचिका, 10 नोव्हेंबरला सुनावणी