Pune Crime News : शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) खून प्रकरण दररोज नवी माहिती समोर येत आहे. शरद मोहोळच्या हत्येच्या कटात दोन नामांकित वकीलांचा सहभाग होता. महत्त्वाचे म्हणजे हत्येपूर्वी आरोपींची वकिलांबरोबर मीटिंग झाली होती. शरद मोहोळवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही (Pune Crime News) आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती.दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणातील दोन आरोपी हे वकील आहेत. दोन्ही आरोपी हे पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी आरपी वकिलांची नावे आहे. त्यापैकी एक वकील ॲड. संजय उढाण याचे एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. आरोपींना कट रचण्यात आणि त्यांना पळून लावण्यात या वकिलांनी मदत केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे..
शरद मोहोळ हत्या प्रकरणाचे वकिल कनेक्शन
शरद मोहोळवर गोळीबार करणारे मारेकऱ्यांनी सातारच्या दिशेने वाहनातून पळायचं ठरवल होतं. मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन पुणे पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग सुरु केला आणि शिरवळ जवळ पाठलाग करून आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. या आठ आरोपीमध्ये या दोन वकिलांचा देखील सहभाग होता. मुख्य आरोपी देखील वकिलांकडे सुरूवात केली आहे. आरोपींना पळून जाण्यास वकिलांनी मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मुळशीमध्ये केला होता गोळीबाराचा सराव
शरद माहोळची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मुळशीमध्ये गोळीबाराचा सराव केला होता. शरद मोहोळला मारण्यासाठी प्रकाश नावाच्या एका व्यक्तीकडून तीन पिस्तुले आणि 11 काडतुसे खरेदी केली. मोहोळवर हल्ला करताना अचूक वेध घेता यावा म्हणून पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी सराव केला होता. शरद मोहोळच्या खुनाच्या पाठीमागे कोणत्या टोळीचा हात आहे का, हे देखील पडताळून पाहत आहेत. शरद मोहोळचा खून टोळीयुद्धाच्या संघर्षातून तर झाला नाही ना, असा ही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
हे ही वाचा :