Majha Katta : काश्मिरी मुलांसाठी काम करणाऱ्या सरहद संस्थेसोबत शमीमा जोडली गेली. त्यानंतर तिच्या संगिताला आणखी धार मिळाली. शमीमा हिने माझा कट्ट्यावर काश्मिरी आणि मराठी अभंगही गायले. त्यावेळी तिने आपल्या प्रवासाविषयीही माहिती दिली. अभंग, गझल, सुफी ते लावणी अशा विविध गायण शमीमाने केलेय. सरहदशी जोडल्याचा प्रसंग शमीमाने सांगितले. लहान असताना संजय नहार यांचं नाव ऐकलं होतं. लहानपणी सरहदसोबत जोडता आले नाही. पण नंतर पुण्यात कश्मिरी फेस्टिव्हलमध्ये एक शो केला. त्यानंतर सरहद संस्थेशी जवळीक झाली, त्यानंतर संस्थेसोबत काम केले. सरहद संस्थेसोबत जोडल्यानंतर कुटुंबाप्रमाणे वाटले. येथे मला आई-वडिल आणि भावाचे प्रेम मिळाले. माझे काश्मिरमध्ये जाण्याचे प्रमाणही कमी झाले, असे शमीमा अख्तर हिने एबीपी माझाच्या कट्ट्यावर सांगितले. 


भारतातील सर्वात मोठं फेस्टिव्हल पुण्यात आयोजित केले. 2016 मध्ये शमीमाला पुण्यात बोलवलं. काश्मिरमध्ये गाणाऱ्यांना आम्ही पुण्यात बोलवायचो. दहशतावद्यांविरोधात लढण्यासाठी आम्ही संगितात अनेक नवनवीन प्रयोग केले.  पसायदानमुळे शमीमा अख्तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. शमीमा हिने विविध भाषामध्ये गाणी गायली आहेत. मराठीमध्येही शमीमा हिने अभंग आणि गाणी गायली आहेत. मराठी लोकांबद्दल, संताबद्दल काश्मिरमधील लोकांमध्ये सकारात्मकपणा आहे. त्यामुळे शमीमा हिने पसायदान गायल्यानंतर काश्मिरमध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. काश्मिरमध्ये पुस्तकांचे गाव सुरु केले. येथील गावातील लोकांनी पुढाकार घेऊन पुस्तकांचे गाव सुरु झाले. या गावाची जगभरात प्रसिद्ध झाले. 11 देशातील लोकांनी या गावाला भेट दिली, असे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी सांगितले. 


सरहद संस्थेविषयी काय म्हणाले संजय नहार ?


सरहद म्युझिकआधीपासूनच होतो.  अतिरेक्यांविरोधात लढताना संगीत हे पण प्रभावी माध्यम ठरु शकते, असे पंजाब आणि काश्मिरमध्ये काम करताना लक्षात आले. अनेक तरुणांचा संगिताकडे ओढा वाढल्यानंतर त्यांचं दहशतवादाकडे जाण्याचे प्रमाण कमी होईल. आशा भावनेतून एका पोलिस अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली. 2002 च्या आसपास त्या पोलिस अधिकाऱ्याने एक बँडही तयार केले होते. त्यांच्याशी नेहमीच चर्चा व्हायची. ते काश्मिरमधील गावागावातील लोक बोलवायचे. पुण्यातही तेच केले. 2006 ते 2007 मध्ये याचं प्रमाण वाढवले. 2008 मध्ये संगिताच्या माध्यमातून दहशतवाद कमी होईल, त्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुशिलकुमार शिंदे यांच्या मदतीने सरकारकडे संगीत विद्यापीठाकडे प्रस्ताव दिला. संगितामध्ये छोटे छोटे प्रयोग सुरु केले. पण याला बळ एसएस व्रिक यांच्यामुळे... त्यांनी पंजाब पोलिसांचं एक बँड तयार केले होते. 300 वर्षातील वाद्यांचा बँड तयार केले. त्यावेळी त्यांना भेटायचो, त्यावेळी अनेक किस्से ऐकले आणि पाहिलेय.. त्यात किती मुले दहशतावादापासून परत आले, तिकडे गेले नाहीत.. ते ऐकले आणि पाहिलेही. त्यामुळेच यात रस निर्माण झाला अन् सरहद संस्थेला उभारी मिळाली, असे सरदहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी सांगितले.