Covid-19 vaccine: जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता नोव्हावॅक्स (Novavax) लसीची मानवी चाचणी करणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अदार पूनावाला म्हणाले की ब्रिटनमध्ये मानवी चाचण्या दरम्यान नोव्हावॅक्सची लस 89.3 टक्के सुरक्षित असल्याचे आढळले. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना देशांतर्गत पातळीवर मानवी चाचण्या घेण्यासंदर्भात अर्ज देण्यात आला आहे. कंपनीला आशा आहे की नोव्हावाक्स लसीच्या चाचणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.


सीरम इन्स्टिट्यूट नोव्हावाक्स लसीची मानवी चाचणी घेणार
पूनावाला म्हणाले, "अमेरिकन कंपनीचा प्रभावी डेटा मिळाल्यानंतर आम्ही ड्रग कंट्रोलर कार्यालयाकडे यापूर्वीच अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांनीही आता लवकरच यास मान्यता द्यावी." नोव्हावॅक्स लसीची फेज III ची मानवी चाचणी 15 हजार व्होलॅन्टियर्सवर घेण्यात आला. या चाचणीत सहभागी होणाऱ्यांमध्ये 18 ते 84 वय वर्ष असलेल्या स्वयंसेवकांचा समावेश होता. ही लस प्रभावी ठरल्यानंतर कंपनीला यूके, युरोपियन युनियन आणि इतर देशांतही अर्ज करण्याची अपेक्षा आहे. सीरम इन्स्टिट्यूट याअगोदरचं ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकासोबत मोठ्या प्रमाणात लस तयार करत आहे.


सीरममधील आगीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान, अदर पुनावालांची माहिती




अमेरिकन कंपनीची प्रोटीन आधारित लस उमेदवार


पूनावाला यांनी या महिन्याच्या सुरूवातीला रॉयटर्सला सांगितले की सीरम संस्था एप्रिल महिन्यापासून दरमहा नोव्हावॅक्स लसीचे 40 ते 50 दशलक्ष डोस तयार करू शकेल. ब्रिटनमधील मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात नोव्हावॅक्सची विकसित लस 89.3 टक्के परिणामी असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये, कोरोना विषाणूविरूद्ध लस तयार करण्यासाठी नोव्हावॅक्सला अमेरिकन सरकारकडून 1.6 अब्ज डॉलर्स प्राप्त झाले. युरोपियन युनियन, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या अमेरिकन कंपनीकडून लस खरेदी करण्याची तयारी आधीच व्यक्त केली आहे. नोव्हावॅक्सच्या विकसित प्रथिने आधारित लस उमेदवाराचे नाव NVX-CoV2373 आहे.