हृषिकेष हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमकॉमच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. मूळ अहमदनगरचा असलेला हृषिकेष नेहमी सकाळी लवकर उठायचा. सोमवारी नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजताच्या सुमारास हृषिकेष उठला आणि आंघोळीला गेला.
काही वेळानंतर हृषिकेषच्या रुममेट्सना तो बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळला. मित्रांनी त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे हृषिकेषला प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे. तरुण वयात विद्यार्थ्यांना होणाऱ्या हृदयविकारांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.