पुण्यात मेडिकल शॉपच्या मालकाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2018 10:02 AM (IST)
मेडिकलच्या दोन दुकानात तोटा झाल्याच्या नैराश्यातून पुण्यातील व्यावसायिकाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
पुणे : पुण्यात व्यावसायिकाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मेडिकलच्या दोन दुकानात तोटा झाल्याच्या नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. 42 वर्षीय विशाल विजयसिंह लावंड यांनी पिस्तुलीत गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं. पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात रविवारी रात्री साडे नऊ वाजता ही घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रविवारी रात्री कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.