Satish Wagh Murder Case : पुण्यातील सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणात काल(बुधवारी) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. (Satish Wagh Murder Case)पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. काही आठवड्यांपूर्वी सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याचा समोर आलं आहे. त्याचबरोबर पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.(Satish Wagh Murder Case)
मुलाच्या मित्रासोबत अफेअर अन् पतीची हत्या
मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मोहिनी वाघ यांनी पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघला अटक केली आहे. मोहिनी वाघचं वय सध्या 48 वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे.अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र आहे. मुलाच्याच वयाचा असल्याने अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला अली नाही. मात्र सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी -सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते. अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. (Satish Wagh Murder Case)
या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम
* 2001 साली अक्षय जावळकरचे आई-वडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले. अक्षयचे वय तेव्हा फक्त नऊ वर्षांचे होते. अक्षयचे आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे, तर वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्याच भागात होतं.
* सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षयचे वाघ यांच्या घरी येणे-जाणे सुरु झाले.
* मात्र अक्षय जेव्हा 21 वर्षांचा झाला तेव्हा 2013 मध्ये त्याचे आणि त्यावेळी 37 वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले.
* दरम्यान अक्षयने सिव्हिल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र 2016 ला अक्षयचे लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याचे आई वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत राहायला गेले.
* मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले.
* सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली.
* मोहिनी वाघ यांनी त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं तिला वाटलं.
* अक्षयच्या मदतीने त्यांनी हत्येचा कट रचला. अक्षयने त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं.
* नऊ डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या पंधरा मिनीटातच त्यांची हत्या करण्यात आली त्यांच्यावर तब्ब्ल 70 वार करण्यात आले.
* मात्र हे पैशांसाठी केलेले अपहरण आहे असा बनवा करण्यात आला. मात्र, पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली , दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलघडा झाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे 9 डिसेंबरला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकवा गेले असताना पाच जणांनी त्यांचे अपहरण करून अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाडीतच वाघ यांच्यावर 72 वेळा वार करून त्यांचा निर्घृण खून केला. तासाभरात या सर्व गोष्टी घडल्या त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. गुन्हे शाखेने त्यांचं अपहरण झालेल्या ठिकाणाहून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक केली.पोलिसांना सतीश वाघ यांच्या पत्नीचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले, तिला आता पोलिसांनी अटक केली आहे. (Satish Wagh Murder Case)