पुणे : कोरोना काळात अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलंय. अशातच पुण्यातील सॅन इंडिया कंपनीने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंब, डिलर, डिलरचे कुटुंबीय, त्यांचे कामगार अशा सर्वांना वैद्यकीय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून या सर्वांना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार आहेत. सॅन इंडिया कंपनी बांधकाम उपकरणे, अवजड यंत्रसामग्री आणि अक्षय ऊर्जा संबधीत उपकरणांची निर्मिती करते. कोरोना महामारीशी लढण्यासाठी सॅन इंडिया कंपनी सातत्याने नवनवीन संकल्पनावर काम करत आहे.

कंपनीने अलीकडेच सर्व कर्मचारी, ग्राहक, डीलर, डीलर कर्मचारी, कामगार या सर्वांसोबत त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोविड केअर हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. हा नंबर सर्व दिवस सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत कार्यरत असणार आहे. ही हेल्पलाईन सॅन इंडिया संपर्क केंद्राद्वारे सांभाळली जाणार असून वैद्यकीय सुविधा जलद पद्धतीने पुरवणार आहे. हेल्पलाइनद्वारे देऊ केलेल्या काही महत्त्वपूर्ण सेवांमध्ये व्हर्च्युअल डॉक्टरांचा सल्ला, वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन, बेड, ऑक्सिजन, प्लाझ्मा आणि अॅम्ब्युलन्स सेवेचा समावेश आहे.

यावेळी बोलताना सॅन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक गर्ग म्हणाले की, "कोविडचा संसर्ग देशभर वाढत असल्याने सर्वांच्या चिंता वाढत आहे. या संकट काळात मदत करणे हा या उपक्रमामागील हेतू आहे." मला खात्री आहे की हेल्पलाइन सेंटरवर काम करणारे आमचे प्रशिक्षित कर्मचारी मदत घेणार्‍या सर्वांसाठी संकटकालीन मित्र म्हणून मदत करतील. कोविड लक्षणांनंतर एखाद्या रूग्णालयात बेड किंवा आपल्या प्रियजनांसाठी वैद्यकीय ऑक्सिजन सुरक्षित केला जाईल. आमच्या विस्तारित सॅन इंडिया कुटुंबातील सदस्यांना त्यांना सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी वेळेवर मार्गदर्शन आणि प्रतिबंधात्मक काळजी पुरविण्याचा यातून प्रयत्न आहे."

हेल्पलाइन सुविधेव्यतिरिक्त, सॅन इंडिया कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना निरोगी आणि सुरक्षित ठेण्यासाठी अनेक उपक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन घेत आहे. ऑफलाईनमध्ये वर्क फ्रॉम होम, आणि प्रत्यक्ष कामावर येताना थर्मल स्क्रिनिंग केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार सॅनिटायझेशन केले जात आहे. सोबतच कोरोना संदर्भात जनजागृतीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून कँम्पेन केले घेतले जात आहेत.