पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी काकडेंनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपने आपला वापर करुन घेतल्याची टीका काकडेंनी केली. राष्ट्रवादीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छाही काकडेंनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री मला भावासारखे आहेत. मात्र भावानेच लाथ मारल्यावर दुसरं घर शोधायला हवं. तसेच दुसरीकडे मला भाजपकडून लोकसेभेचं तिकीट मिळेल, असा मला विश्वास आहे. मात्र मुख्यमंत्री माझा विश्वास खरा ठरवतील की नाही हे येणारा काळच सांगेल, असंही काकडे म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मला कशी वागणूक दिली, हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मी याबाबत मुख्यमंत्रांशी बोललो. मात्र त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना शेवटचं भेटायचं आणि याबद्दल अखेरचा निर्णय घ्यायचा, अशी भूमिका संजय काकडे यांनी घेतली आहे.
पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे काँग्रेस जो उमेदवार देईल त्याचं काम करणार, असं अजित पवार यांनी काकडेंना सांगितलं. तसेच पुण्यातून अपक्ष निवडणूक लढवणं सोपं नसल्याचा सल्लाही त्यांनी काकडेंना दिला.
व्हिडीओ