पुणे : पुण्यात 'सनातन संस्थे'ने नेहमीप्रमाणे यंदाही आपला हेकेखोरपणा कायम ठेवला आहे. कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याला सनातनकडून जोरदार विरोध केला जात आहे.

वाहत्या पाण्यात गणेश मूर्तींचं विसर्जन करा आणि आपल्या धर्माचं पालन करा, असं आवाहन सनातनच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांना 'सनातन संस्थे'च्या कार्यकर्त्यांनी हा आग्रह धरला.

खरं तर पुणे महानगरपालिकेनं गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधले आहेत. मात्र त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना सनातनच्या कार्यकर्त्यांकडून नदीकडे पाठवलं जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या प्रकाराला तीव्र विरोध करण्यात येत आहे.