पुणे : मराठा समाजाला एसइबीसी (SEBC) नुसार आरक्षण मिळणे शक्य नाही. त्यामुळं ईडब्लूएस (EWS) अंतर्गत जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यावं, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणवणारे नेते या विषयाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष आहे. या स्थगितीविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. या स्थगितीविरोधात राज्यभर आंदोलनं सुरु आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व आमदारांनी विशेष अधिवेशन बोलावन्यात यावे यासाठी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे आमदारांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपच्या नेत्यांकडूनही राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आदोनलं सुरु आहेत. भाजप खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मात्र मराठा आरक्षणावर वेगळी भूमिका मांडली आहे.


'मराठा समाजाला आरक्षण देऊन भाऊबीजेची ओवाळणी द्या', महसूलमंत्र्यांच्या बहिणीची मागणी


जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यावं : गायकवाड


मराठा समाजाला एसइबीसी (SEBC) नुसार आरक्षण मिळणे शक्य नाही. त्यामुळं ईडब्लूएस (EWS) अंतर्गत जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यावं, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणवणारे नेते या विषयाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आंदोलनामुळे समाजातील तरुणाईचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आता ते सगळं थांबवून जागतिकीकरणाचे लाभ घेण्याची मानसिकता बाळगणं गरजेचं असल्याचं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे.


पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही : अजित पवार


बीडमध्ये मराठा तरुणाची आत्महत्या


वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवेक कल्याण रहाडे असं या 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.


शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने आज दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकस्मिक मृत्यूची नोंद बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.


"आत्महत्या हा पर्याय नाही, आत्महत्या नका करू ही लढाई आपण नक्की जिंकू", खासदार संभाजीराजेंचं आवाहन