Sambhaji Bhide Controversial Statement : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही भाष्य केले. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती, असे संभाजी भिडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


पुण्यातील (Pune) दिघी येथे रविवारी (25 जून) संभाजी भिडेंच्या जाहीर व्याख्यान होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने आयोजन केले होते. यामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही.  या दिवशी भारताची फाळणी झाली.  या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायंच नमस्कार नाही.  आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असे भिडे म्हणाले.


संभाजी भिडेंचा राष्ट्रगीतावर आक्षेप का?


रवींद्रनाथ टागोरांनी 1911 मध्ये केली 'जन गण मन'ची रचना


टागोरांनी रचलेल्या गीतात पाच कडवी, राष्ट्रगीत म्हणून एकच कडवं स्वीकारलं


जन गण मन 1911 मध्ये भारतात भरलेल्या दिल्ली दरबारसाठी रचल्याचा आरोप


हे गीत दिल्लीत भरलेल्या दरबारात ब्रिटन सम्राट जॉर्ज पंचमला 


भारत सम्राट जाहीर केलं जातं होतं त्यासाठी रचलेल्याचा आरोप


टागोरांनी मात्र एका पत्रातून तेव्हा हे सर्व आरोप नाकारलेले आहेत. 


गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?


भारताला राजकीय स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 लाच मिळालेले आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे, भारताची फाळणी झाली, विभागणी झाली. आपल्याला अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत होईल, तेव्हाच समाधान होणार आहे. पण याचा अर्थ 15 ऑगस्ट 1947 भारताचा स्वातंत्र्य दिवस नाही, हे त्या अर्थाने कुणी म्हणत असेल तर योग्य नाही. तोच आपला स्वातंत्र दिवस आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


आणखी वाचा :


डंके की चोट पे...! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलचा एसटी बॅंक निवडणुकीत विजय, पवार पुरस्कृत पॅनलचा दारुण पराभव