पुणे : "संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं" असं म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अप्रत्यक्षपणे नेत्यांचे कान टोचले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुरू साहिब यामधील संत नामदेव या विशेष आवृत्तीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यानंतर राज्यपालांनी संतांच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले.
राजा बदलले असतील, राज्य लहान-मोठे बनले असतील, काही राज्यांचे तुकडेही झाले असतील. मात्र. देशाच्या हृदयातील आत्म्याचे तुकडे कधीच झाले नाहीत. याच संतांमुळं आपली संस्कृती आणि आत्मा जीवंत आहे. संतांच्या या कार्यामुळेच आपला देश वाचलाय. असे गौरवोद्गार काढतानाच "संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं" असं राज्यपालांनी नमूद केलं. आजकाल मीच गुरू, मीच महात्मा असं म्हणणारे स्वतःची पूजा करावी म्हणून धिंडोरे पीठतात. त्यांना ही राज्यपालांनी शालजोडे लगावले. संत नामदेव, गुरू गोविंद सिंग यासह देशातील प्रत्येक संतांनी दिलेली शिकवण सर्वांनी अंमलात आणावी असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून #KaroNaSalaam अभियानाचे कौतुक
सोशल मीडियावर वेळ घालवणाऱ्यांना राज्यपालांचा सल्ला
आपण रोजच मोबाईलला चिटकून असतो. प्रत्येक ठिकाणी अनेकजण मला म्हणतात मी फेसबुकवर तुमच्याशी जोडला गेलोय. पण प्रत्यक्षात मी स्वतःचा कधी 'फेस' पाहिला नाही, तर मग 'फेसबुक' कधी पहायचो. पण हे त्या लोकांना माहीत नसल्याने ते पुढे आणखी प्रश्न विचारतात. फेसबुकवर कोणी हे, कोणी ते लिहिल्याचे ते आवर्जुन सांगतात. बरं लिहिलं ही असेल, पण अशा पोस्टमध्ये ते स्वतःचा वेळ वाया घालवतात. आता ही नवी परंपरा आहे. म्हणूनच अधिकारी ही मला म्हणतात तुमचं ही ट्विटर अकाउंट असायला हवं. मी त्यांना म्हणतो तुम्ही करा ट्विट, क्यूँकी मुझे हे सभी ट्विट 'टूटके' लगते है. तेव्हा सोशल मीडियाला आहारी गेलेल्यांनी थोडे संतांचे ही विचार अमलांत आणण्यासाठी वेळ खर्ची घालावा, असा सल्ला राज्यपालांनी दिला.
OBC Reservation | ... तर भाजप रस्त्यावर उतरेल : देवेंद्र फडणवीस