मुंबई: कोरोनामुळे 2019 च्या नोव्हेंबर महिन्यापासून संपूर्ण जगासमोर कोरोना संकट उभं राहिलं आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मार्च 2020 नंतर अचानक वाढ झाली होती. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी सर्वसामान्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची संकल्पना राबवण्याचे आवाहन भारत सरकारने केले होते. दरम्यान, जेव्हा आपल्यापैकी बहुतेक लोक आपापल्या घरांमध्ये सुरक्षित होते तेव्हा काही लोक या गंभीर परिस्थितीचा मुकाबला करत त्यांच्या घरी न जाता बाहेर काम करीत होते. ही मंडळी म्हणजे आपले डॉक्टर, रुग्णालयाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी, पालिकेची कर्मचारी आणि आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू पुरवणारे विक्रेते.
ही सगळी परिस्थिती व हेच आपले खरे ‘योद्धा’ आहेत हे लक्षात घेत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूमार्फत प्रेरणा मिळवून, एवरीमिडिया टेक्नोलोजीसचे गौतम ठक्कर, भाजपच्या युवा नेत्या सायली कुलकर्णी, मुंबई अनसेंसर्डचे सिद्धांत मोहित नि लेओ क्लबचे श्वेतांक महेश्वरी यांनी एकत्र येत #KaroNaSalaam अशी एक अभियान राबवली. आपल्या ‘कोविड योद्धांना’ मनापासून सलाम करत प्रोत्साहन देणे हे या मोहिमेचे मुळ उद्दिष्ट आहे.
देशभरात ही मोहीम प्रचंड गाजली व 29 नोव्हेंबर 2020 पर्यंत एक लाखाहून अधिक नोंदी या अभियानाद्वारे झाल्या होत्या. #KaroNaSalaaच्या टीम ने काही दिवसांपूर्वी या मोहिमेचा एक छोटासा व्हिडिओ महाराष्ट्राचे राज्यपाल भरतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सादर केला. राज्यपालांनी या अभियानाचे कौतुक केले आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर केल्याबद्दल या टीमला दाद देखील दिली. या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी प्रख्यात कलाकार आणि जाहिरात-गुरू श्री. भारत दाभोळकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. दिलीप चावरे, आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. रघुनाथ कुलकर्णी आज राजभवनात उपस्थित होते.