पुणे: संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज मोरे (Shirish maharaj More) यांनी आज आपल्या राहत्या घरी आर्थिक विवंचतेच्या कारणास्तव आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. ह.भ.प शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते, ते देहुगाव परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.  शिरीष महाराज  (Shirish maharaj More) यांचे काही दिवसांपुर्वी लग्न ठरले होते, साखरपुडा देखील झाला होता. 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होता, मात्र त्यांनी आधीच असं टोकाचं पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. मंगळवारी (५ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास उपरण्याच्या सहाय्याने त्यांनी गळफास लावून घेतल्याची माहिती आहे. शिरीष महाराज यांनी नुकतंच नवीन घर बांधलं होतं. खालच्या मजल्यावर त्यांचे आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. काल (मंगळवारी, ता 5) रात्री मोरे वरती आपल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते. त्यामुळे घरातील सदस्य वरती गेले. दरवाजा वाजवला पण दार उघडलं जात नव्हतं. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने घरातील सदस्यांनी दार तोडले. मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दरम्यान, प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून टोकाचे पाऊल उचलले असल्याते समजते. 


शिरीष महाराजांचा थोडक्यात परिचय


शिरीष मोरे महाराज यांचे देहूतील धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठे योगदान होते. ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असत. त्याचबरोबर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे देहूतील आरएसएस कार्यकर्त्यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा पंचक्रोशीत मोठा नाव लौकीक होता. नुकतंच त्यांचं लग्न देखील ठरलं होतं. 


आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती 


देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊत उचलत आपलं जीवन संपवलं आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच ही घटना घडली आहे.


शिरीष महाराज यांनी आपलं जीवन संपवण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.