पुणे : आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी युवकांच्या प्रश्नांना हात घालत तब्बल 800 किलोमीटरचं युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटीसह विविध प्रश्नांवर या यात्रेदरम्यान विचारमंथन करण्यात येणार आहे. ही पदयात्रा तब्बल 13 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातून (Pune News)  युवा संघर्ष यात्रेला सुरवात होणार असून 45 दिवसांचा प्रवास करून 7 डिसेंबर रोजी नागपूरला याची सांगता होणर आहे. आज सकाळी  महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना अभिवादन करुन रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर लाल महाल,  बालगंधर्व मार्गे टिळक स्मारकला अकरा वाजता यात्रा पोहचणार.  सकाळी 11 वाजता टिळक स्मारकमध्ये कार्यक्रम शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे यात्रेला संबोधित करणार आहे. महात्मा फुले स्मारक ते टिळक स्मारक मंदिरापर्यंत रोहित पवारांचा रोडशो असणार आहे.

Continues below advertisement


 आमदार रोहित पवार यांनी युवकांच्या प्रश्नांना हात घालत तब्बल 800 किलोमीटरचं युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी आदीसंह विविध प्रश्नांवर या यात्रदरम्यान विचारमंथन करण्यात येणार आहे. ही यात्रा 800 किलोमीटरची पदयात्रा असून तब्बल 13 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातून युवा संघर्ष यात्रेला सुरवात होणार असून 45 दिवसांचा प्रवास करून 7 डिसेंबर रोजी नागपूरला याची सांगता होईल


रोहित पवार म्हणाले की, ‘युवा संघर्ष यात्रा’ ही युवांच्या नेतृत्वाखालील एक चळवळ आहे, ज्याचा मूळ उद्देश महाराष्ट्रातील युवांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जनसमर्थन एकत्रित करणे आणि युवा वर्गाचा आवाज शासनापर्यंत पोहचवणे हा आहे. आज युवा म्हणून संवाद साधत आहे. ज्या दिवसापासून राजकारणात आलो, तेंव्हापासून युवांचे प्रश्न मांडणे अन त्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करत आलो आहे. मतदारसंघाप्रमाणेच युवांच्या प्रश्नांना ही प्राधान्य मांडले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी, शाळा दत्तक देण्याचा निर्णय आदी प्रश्नावर आवाज उठवला जाणार आहे. त्याचबरोबर आजच्या राजकारणाची परिस्थिती पाहता युवा नेत्यांनी राजकारणात आलो ही चूक झाली का? किंवा नव्या पिढीने राजकारणात यावं की नाही?  असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.  


असा असणार युवा संघर्ष यात्रेचा प्रवास


राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून युवा संघर्ष यात्रेला येत्या 24 ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे पुण्यातून या यात्रेला सुरुवात होईल पुणे ते नागपूर असा हा 800 किलोमीटरचा प्रवास असणार आहे एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.