पुणे : पुण्यात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. या दरोड्यात चोरट्यांनी बँकेतील 27 लाखांची रोकड लंपास केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे.


पुण्यातील सेव्हन लव्ह चौकातील टिंबर मार्केटमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा दरोडा पडला आहे. सकाळी बँकेत 12 ते 13 जणांनी घुसून बँक कर्मचाऱ्यांची दिशाभूल करुन बँकेच्या कॅशिअर काऊंटरवरील कॅश पेटीवर डल्ला मारला आणि तब्बल 27 लाखांची रोकड घेऊन हे चोर पसार झाले.


घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार या दरोड्यात सहभागी असलेले काही चोर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे.


बँकेत दरोडा टाकल्यानंतर पळून जाताना हे सर्व आरोपी विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहेत. या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करुन त्याआधारे पोलिसांना या आरोपींचा शोध सुरु केला आहे.


व्हिडीओ- पुण्यात दिवसाढवळ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा, चोर सीसीटीव्हीत कैद