पिंपरी-चिंचवड :  पिंपरी चिंचवड शहरात अनलॉकचा पुढचा टप्पा सोमवारपासून लागू होणार, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.  त्यामुळे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सायंकाळी 7 पर्यंत दुकानं खुली राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता विकएंड लॉकडाऊनमध्ये सुरूच राहणार आहे. 


काय सुरु काय बंद?



  • अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त  इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद 

  • सार्वजनिक वाचनालय सुरु 

  • स्पर्धा परीक्षा क्लासेस, कोचिंग क्लासेस अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 %  क्षमतेने सुरु 

  • मॉल 50% क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र सिनेमागृह, नाट्यगृह, संपूर्णतः बंद 

  • व्यायामशाळा,  सलून, ब्युटी पार्लर, स्पा,  आसन क्षमतेच्या 50 % क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार  फक्त सोमवार ते शुक्रवार सुरु

  •  मात्र सदर ठिकाणी ए. सी.  सुविधा वापरता येणार नाही.

  •  कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना  ( बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व  सुरु

  • मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु 

  • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50%  क्षमतेने  सुरु

  • फक्त घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहणार आहे.  स्वतः जावून पार्सल आणणे  बंद राहील. 

  • शनिवार व रविवार फक्त घरपोच सेवा  रात्री 11 पर्यंत सुरु राहिल, स्वतः जावून पार्सल आणणे, बंद राहील.

  • लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी, शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा  यांच्या कर्मचा-यांना प्रवास करण्यास परवानगी

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी  5 ते रात्री  9 व दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु 

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड 19 व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये,  100 % क्षमतेने सुरु 

  •  शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयां व्यतिरिक्त ) 50% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु 

  •  जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी. 

  • सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना, सेवा  व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी  50 % कर्मचारी क्षमतेने सुरु 

  • सर्व आउटडोअर स्पोर्ट्स ( Outdoor games ) हे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. तसेच इनडोअर स्पोर्ट्स ( Indoor games ) सकाळी  5 ते  9 व सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुरु

  • सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रमास 50 लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी 7  वाजेपर्यंत परवानगी राहणार

  •  लग्न समारंभ कार्यक्रम हे हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 % क्षमतेने जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यास परवानगी 

  • अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20  लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी

  • विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा या  50 % उपस्थितीत घेण्यास परवानगी 

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील बांधकामे नियमितपणे सुरु 

  • ई - कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 5  पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी ) प्रतिबंध राहील. तसेच रात्री 10 नंतर अत्यावश्यक कारण  वगळता संचारबंदी लागू राहील. 

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (PMPML) आसन क्षमतेच्या 50 % क्षमतेने  सुरु 

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने, बाजार, कंपनी, फॅक्टरी, बांधकाम स्थळ  ( Construction Site ), हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट इ. ठिकाणी काम करणा-या कामगार व इतर व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी  ( RAT ) दर पंधरा दिवसांनी  करणे बंधनकारक राहील.