पुण्याला दररोज पाणी पुरवठा करण्याचे महापौरांचे प्रशासनाल आदेश
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 04:01 PM (IST)
पुणे: वरूणराजाच्या कृपादृष्टीमुळं पुण्यातल्या धरणांची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. त्यामुळं उद्यापासून पुण्याला दररोज पाणी पुरवठा करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. सध्या पुण्यात एकदिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे. मात्र, पाऊस सुरु झाल्यापासून पाणीटंचाई मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली होती. महापौरांनी दररोज पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले असले तरी प्रशासन पातळीवर त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, याआधीही महापौरांनी पाणीपुरवठा मागे घेतल्याची घोषणा केली होती. मात्र आयुक्तांनी त्याची अमंलबजावणी शक्य नसल्याचं सांगितलं होतं.