खडकवासलातून पाण्याचा विसर्ग सुरु, पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 03:43 PM (IST)
पुणे: पुण्याच्या खडकवासला धरणातून 31 हजार 450 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीकाठच्या काही भागांमध्ये पाणी शिरलं आहे. खडकवासलातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे. या पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे धरणातून हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.