पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील समर्थ लॅबोरेटरीज या कंपनीवर छापा टाकून कस्टम विभागाने तब्बल 159 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
मेफेड्रोन हायड्रोक्लोराईड असं या अंमली पदार्थाच नाव असून आंतररष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 25 कोटी रुपये आहे. काही दिवसांपूर्वीच ही कंपनी सुरु झाली होती. बंदी असलेला मेफेड्रोन हायड्रोक्लोराईड नावाचा अंमली पदार्थ तयार करुन तो लंडनला पाठवण्यात येत होता.
या एमआयडीसीमध्ये अनेक केमिकल कंपन्या आहेत. मात्र, समर्थ लॅबोरेटरीजने मात्र कोणताही परवाना घेतला नव्हता. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असुन त्यामधे एका विदेशी नागरिकाचा समावेश आहे.