बिल्डर अविनाश भोसलेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 02 Aug 2016 12:16 PM (IST)
पुणे : प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे. भोसले यांच्यावर षडयंत्र करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भोसलेनगरमधील यशवंत घाडगेनगरमधील जमीन संगनमताने फसवणूक करून बळकावल्याचा आरोप अविनाश भोसलेंवर आहे. सध्या या जागेवर अलिशान एबीआयएल हाऊस या अविनाश भोसले यांच्या कंपनीच कार्यालय आहे.