कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उडता पंजाब सारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे. पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Pune Car Accident) रक्त फेकून देण्यापर्यंत गुन्हा ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) लॅबमधील डॉक्टरांनी केला. पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. पुणे अपघात प्रकरणात ब्लड अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेंचा मोठा हात होता.
रविंद्र धंगेकर म्हणाले, ललित पाटील प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही. धंगेकर हा घाबरणारा माणूस नाही. सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये. मी पुणेकर आहे घाबरणारा नाही. 4 तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेन. पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे. सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे. महसूल असो किंवा गृहखाते असो हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत. पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाही हे लक्षात आल्यावर दोन पोलीस निलंबित केले.
पब संस्कृती थांबली पाहिजे : रविंद्र धंगेकर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उडता पंजाब सारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे. लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो, पब संस्कृती थांबली पाहिजे ही भूमिका आहे. पुण्यामध्ये देशभरातील सर्व शहरातून मुलं शिकण्यासाठी येत आहेतय. या प्रकरणानंतर इतर देशातील शहरातून येणाऱ्या मुलांच्या पालकांचे फोन येत आहेत, असे रविंद्र धंगेकर म्हणाले.
लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा रस्त्यावर उतरणार : रविंद्र धंगेकर
पुण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या संरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार. हसन मुश्रीफ यांच्या काळात डॉक्टर कसे वागतात, हे त्यांना माहिती आहे. काळे याला बाजूला करून आपल्या मनाचा अधिकारी त्याठिकाणी आणला जातोय का, अशी शंका येत आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा रस्त्यावर उतरणार. मला नोटीस पाठवण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी बंद करा. मी मंत्र्यांच्या मतदारसंघात, मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन माझं म्हणणं मांडणार आहे. माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करून पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाही, मी जेलमध्ये जाईन, असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
हे ही वाचा :