पुणे : शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal Case) पळून गेल्याच्या प्रकरणावर टीका करताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह त्यांचा निकटवर्तीय समीर पाटील याचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. धंगेकर यांच्या या भूमिकेनंतर पुण्यातील महायुतीत एकच वादळ आल्याचा पाहायला मिळालं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील धंगेकर यांच्या या स्टॅन्डवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी तर मी त्यांच्या 'बॉस'शी बोलेल असं म्हटलं होतं.
रविवारी एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी धंगेकरांना 'महायुतीत नो दंगा' असा क्लिअर मेसेज दिला होता. माझं रवींद्र धंगेकर यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. धंगेकरांना मी सांगितलं आहे की, महायुतीत दंगा नको. त्यांनी जे सांगितलं की, पुण्यामध्ये कायद्या आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कोणताही त्रास होता कामा नये. पुण्यामध्ये महिला, मुली आणि नागरिकांना निर्भयमध्ये फिरता आलं पाहिजे. कायदा-सुव्यवस्था राखली गेली पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होत.
Ravindra Dhangekar PC Today : धंगेकर आपली भूमिका बदलणार का?
उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितल्यानंतर रवींद्र धंगेकर आपली भूमिका बदलणार का? भाजप नेत्यांवर ज्या पद्धतीने धंगेकर टीका करत आहेत त्यामध्ये नरमाई येणार का? हा प्रामुख्याने प्रश्न होता. याच अनुषंगाने रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
Ravindra Dhangekar On Chandrakant Patil : आपल्यावर मोक्का लावण्याचा प्रयत्न
या पत्रकार परिषदेमध्ये रवींद्र धंगेकर यांनी मी पुणेकर आहे, सत्य बोलतो. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही अशी थेट भूमिका घेतल्याने त्यांच्या रडावर अजूनही भाजपच असल्याचं स्पष्ट झालं. इतकंच नाही तर रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. समीर पाटील हा माझ्यावर चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत मोक्का लावणार असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणालेत.
Ravindra Dhangekar On Pune Crime : लोक म्हणतात, समीर पाटीलला सोडू नका
समीर पाटील हा पूर्वी आर आर पाटलांकडे होता. त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता. मला सांगलीचे लोक रोज भेटतात. ते म्हणतात याला सोडू नका. हा चुकीचा माणूस आहे. समीर पाटील हा माझ्यावर चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत मोक्का लावण्याच्या तयारीत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत माझ्यावर गुन्हे दाखल कसे करायचे हे काम त्याचं सुरू आहे, माझी याला काहीच हरकत नाही असं धंगेकर म्हणाले.
Ravindra Dhangekar News : आवाज कुणीही दाबू शकत नाही
समीर पाटीलची जी भाषा आहे ते तो बोलत आहे का? असा सवाल सुद्धा धंगेकरांनी केला आहे. दरम्यान, मी पुणेकर आहे मी सत्य बोलतो. माझा आवाज कोणीही बंद करु शकत नाही. असं म्हणतं धंगेकर यांनी एकाप्रकारे आपण शांत बसणार नाही असं जाहीरच करून टाकलंय. त्यामुळे आता धंगेकर यांच्या भूमिकेमुळे महायुतीत वाद वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
चंद्रकांत दादा पाटील यांच्या निकटवर्तीय समीर पाटील यांनी धंगेकरांना आता कोर्टाद्वारे अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याचं ठरवलं आहे. मी चंद्रकांत दादा पाटीलकडे कामाला नाही किंवा मी भाजपचा कुठला पदाधिकारी नाही, धंगेकर माझ्यावर खोटे आरोप करत आहेत असं समीर पाटील म्हणाला.
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतील नेत्यांमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोप खरंच थांबतील का? का फक्त अशाच पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू होणार आहेत हे पाहावं लागेल.