यंदा राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळाला, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्रीतून झालेल्या पावसाने झोडपले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर आले, अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले. लातूर, बीड, धाराशिव ,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली अशा सर्वच जिल्ह्यात बेफाम पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. 

Continues below advertisement

दरम्यान, अतिवृष्टी, पुरामुळे राज्यातील 29 जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारकडून 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली. त्याचबरोबर समाजातील विविध संस्था आणि संघटनाही आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. अशाच सामाजिक जबाबदारीचे आणि मानवसेवेच्या परंपरेचे पालन करत श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख रुपये सुपूर्द केले.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी हा निधी देण्यात आला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दुष्काळाच्या काळात स्वतःचा सर्व साठा गरजूंना अर्पण करून मानवतेचा जो आदर्श घालून दिला, त्याच प्रेरणेने संस्थानने हे सामाजिक कार्य हाती घेतले आहे. (Shri Sant Tukaram Maharaj Sansthan Dehu 11 lakhs donate)

Continues below advertisement

संस्थानचे अध्यक्ष व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज जालिंदर महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे आणि लक्ष्मण महाराज मोरे उपस्थित होते. संस्थानच्या वतीने सांगण्यात आले की, “दीनदुबळ्या आणि पीडित जनतेची सेवा करणे हेच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिकवणीचे सार आहे आणि भविष्यातही सामाजिक गरजा ओळखून हे कार्य अखंडितपणे सुरू राहील...”

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 1 कोटी

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली, त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना ‘श्रीं’च्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. 

हे ही वाचा -

CM Majhi Shala, Sundar Shala Scheme: 'आनंदाच्या शिधा'नंतर एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद?; लाखो रुपयांची दिली होती पारितोषिके