पिंपरी (पुणे) : मंदिरात दर्शनाला निघालेल्या दोन मुलींवर रविवारी चॉकलेटचं आमिष दाखवून रविवारी बलात्कार करण्यात आला. या दोघींपैकी एकीचं पोट खूप दुखू लागलं आणि ती जागेवरच बेशुद्ध झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेल्यावर संपूर्ण घटना डॉक्टरांच्या तपासातून उजेडात आली. याच मुलीचा काल रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हिंजवडी पोलिसांनी दुसऱ्या पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला आणि आरोपी गणेश निकमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलं.

काय आहे घटना?

बारा वर्षीय दोन मैत्रिणी रविवारी दुपारी एका मंदिरात दर्शनाला निघाल्या होत्या. तेव्हा नराधम गणेश निकम आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने दोघींना चॉकलेटचं आमिष दाखवून जवळच्या शेतात नेले. तिथे या नराधमांनी त्या दोघींवर बलात्कार केला.

पीडित दोघांच्याही त्या दिवसापासून पोटात दुखत होतं. त्यापैकी एका मुलीला मात्र घडलेल्या कृत्यामुळे सावरणं कठीण झालं आणि ती बेशुद्ध पडली. तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या तपासातून हा प्रकार समोर आला.

त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी दुसऱ्या पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारलं असता, तिने घटनाक्रम सांगितला.

हिंजवडी पोलिसांनी नराधम गणेश निकम याला अटक केलीय, तर अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलंय.